सगळ्यांनी आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या चोरी पाहिल्या असतील किंवा यांविषयी ऐकलं असेल. आत्ता समोर आलेली घटना चप्पल चोरांची आहे. चप्पल चोरांच्या टोळीची दहशतीचा व्हिडीओ समोर आलाय. रात्रीच्या वेळी चोरी करण्याची त्यांची टेक्निक सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
बंगळुरू येथील शांतीनगर अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजने या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी रात्री तीन वाजता आपले कारनामे करण्यासाठी अपार्टमेंटमध्ये एन्ट्री घ्यायची. त्यानंतर तासाभरात संपूर्ण अपार्टमेंटमधील चप्पल चोरून पळून जायची.






