आशिया कप क्रिकेट..भर मैदानात पाकिस्तानी खेळाडूने अफगाण गोलंदाजावर उगारली बॅट…व्हिडिओ

0
712

आशिया कपमध्ये बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघामध्ये पार पडलेल्या सामन्यात मैदानातच खेळाडू भिडल्याचं पहायला मिळालं. पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीने अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद याच्यावर बॅट उगारल्याने काही काळासाठी तणाव निर्माण झाला. यानंतर अफगाणिस्तानच्या काही खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर अडखळला होता. १९ व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर आसिफ बाद झाल्यानंतर फरीदने त्याच्यासमोर जाऊन आक्रमकपणे आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. यानंतर चिडलेल्या आसिफने त्याला मागे ढकललं. यानंतर फरीद पुन्हा पुढे आल्यानंतर आसिफने त्याच्यावर बॅट उगारत संताप व्यक्त केला. यानंतर अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंनी फरीदला बाजूला नेत वाद मिटवला.