Atal Pension Yojana…केंद्र सरकार देतेय दरमहा 5000 रुपये..वाचा सविस्तर

0
576

Atal Pension Yojana अटल पेन्शन योजना ही पूर्वी असंघटीत कामगारांसाठी सरकारने सुरु केली होती. पण तिची लोकप्रियता पाहता ही योजना आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेत रक्कम गुंतवू शकता. या योजनेत आता गुंतवणूक केल्यास वृद्धापकाळात चांगली रक्कम हाती येऊ शकते. दरमहा केंद्र सरकार गुंतवणुकीच्या आधारे रक्कम जमा करते.
या योजनेत गुंतवणूकदाराला दरमहा 1000 ते 5000 रुपयांचा लाभ मिळतो. केंद्र सरकारने दर महिन्याला लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम हस्तांतरीत करते. अटल पेन्शन योजनेसाठी तुम्हाला अगोदर रितसर नोंदणी करावी लागते. नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. योजनेतंर्गत लाभार्थ्याला दरमहा एक ठराविक रक्कम त्याच्या खात्यात मिळते.

18-40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक याचा लाभ घेऊ शकतो. तुम्हालाही पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेत तुम्हाला खाते उघडावे लागेल. योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे लाभार्थ्याला आयकर कलम 80CCD अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना केंद्र सरकारने यापूर्वी सुरू केली होती, मात्र त्यानंतर तिची लोकप्रियता वाढली आणि सरकारने 18 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंतच्या सर्व लोकांसाठी ही योजना खुली केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून खाते उघडू शकता.

वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी झाल्यास, तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील. वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला 5000 रुपयांची पेन्शन मिळेल. 1000 रुपयांच्या पेन्शनसाठी 42 रुपये, 2000 रुपयांच्या पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी 126 रुपये आणि 4000 रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा 168 रुपये जमा करावे लागतील.