अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारण्यासाठी खोदकाम सुरू असताना जमिनीमध्ये अनेक प्राचीन मूर्ती आणि स्तंभ आढळले आहेत. राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. महत्त्वाचंं म्हणजे बाबरी मशीद उभी राहण्याआधी इथं राम मंदिर होतं, असा दावा हिंदू पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात केला होता. आपल्या निर्णयात कोर्टानं तो मान्य देखील केला होता. आणि त्याचाच आणखी पुरावा म्हणजे नव्या राम मंदिराच्या बांधकामादरम्यान देखील आता प्राचीन अवशेष सापडले आहेत.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी फोटो शेअर करताना लिहिले की, ‘श्री रामजन्मभूमी येथे उत्खननादरम्यान सापडलेल्या प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्यात अनेक पुतळे आणि खांबांचा समावेश आहे’.






