अजितदादांचे मिशन ‘नगर जिल्हा’, बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

0
2264

राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा हे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेश सोहळ्यास विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी श्रीगोंद्यात येत आहेत. अजित पवार यांनी नाहाटा यांची राज्य बाजार समिती महासंघ सभापती पदावर केलेली निवड आणि श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होण्यासाठी घातलेले लक्ष या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे लक्ष या दौऱ्याकडे आहे. पत्रकार परिषदेत बोलताना नाहाटा म्हणाले, अजित पवार यांनी आपली विनाअट राज्य बाजार समिती महासंघ सभापतिपदी निवड केली. हा माझ्या राजकीय जीवनातील सर्वोच्च बहुमान आहे. बदल्यात आपण आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदे मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करू. यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीने तुमच्याशी मतभेद असणाऱ्या नेत्याला उमेदवारी दिली तर? कोणती भूमिका घेणार असे विचारता नाहाटा म्हणाले, मी उमेदवार न पाहता राष्ट्रवादीला प्राधान्य देईल, असे ते म्हणाले.