आता हेच राहिलं होतं….पाणीपुरीत काय मिसळलं जातय एकदा पहाच…व्हिडिओ

0
105

विविध टेस्टचे पाणी असलेली पाणीपुरी तुम्ही आत्तापर्यंत खाल्ली असेलच पण सध्या एक दुकानदार त्यात अशी गोष्ट मिसळून लोकांना खायला घालत आहे, ते पाहून तुम्ही डोक्याला हातच लावाल ! सध्या तूफान व्हायरल गहोत असलेल्या या क्लिपमध्ये तो दुकानदार चक्क ‘केळं’ घातलेली पाणीपुरी विकताना दिसत आहे. व्हिडीओत ही पाणीपुरी कशी बनते तेही दाखवलं आहे. पाणीपुरी विकणाऱ्या या भय्याने जी अतरंगी गडबड खरतंर असा अन्याय केला आहे, तो कोणीच खरा पाणीपुरी प्रेमी सहन करू शकणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसंतय की पाणीपुरी विकणारा हा माणूस, उकडलेले बटाटे किंवा मटारऐवजी पिकलेले केळे वापरत आहे.

एका भांड्यात त्याने केळी सोलून चांगली मॅश केली, मग त्यात हरभरा, मसाले आणि हिरवी कोथिंबीर मिसळून सारण तयार केले. आणि ते सर्व पाणीपुरीच्या पुरीच भरून त्यावर चटकदार पाणी टाकून तो ते लोकांना खायला देत आहे. आता हा अतंरगी प्रकार कुठला, हा प्रश्नही तुम्हाला पडला असेलच. तर तुमची जिज्ञासा शमवण्यासाठी आम्ही सांगू इच्छितो की केळ्याची ही अतरंगी पाणीपुरी तुम्हाला गुजरातमध्ये दिसेल. @MFuturewala या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.