20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. तेव्हापासूनच टीममध्ये बदलाची मागणी सुरु होती. इंग्लंडने टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव केला होता. BCCI ने आता बदलाच्या दिशेने पहिलं मोठं पाऊल टाकलं आहे. सिलेक्शन कमिटीचे प्रमुख चेतन शर्मा यांच्यासह सगळी निवड समितीच बरखास्त केली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने याची घोषणा केली आहे.