Home ब्रेकिंग न्यूज मुंडे बंधू भगिनीमध्ये दिलजमाई… एकत्र येत पॅनलची घोषणा

मुंडे बंधू भगिनीमध्ये दिलजमाई… एकत्र येत पॅनलची घोषणा

0
27

बीड जिल्ह्यातील साखर कारखाना निवडणुकीत पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे एकत्र आले आहेत. आम्ही एकत्रित पॅनल करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही एकत्र आलोय, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.

भाजपची आज पुण्यात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील आले आहेत. याच बैठकीला पंकजा मुंडे देखील आल्या होत्या. यावेळी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना बीडमधील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं