व्हिडिओ भारतातील आहे की बाहेरचा आहे यासंदर्भात माहिती समोर आली नाही. पण अनेक बेकरी आणि केक बनवण्याच्या कारखान्यामध्ये अशी परिस्थिती असते. तर काही बेकऱ्यांमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते. त्यामुळे आपण ज्या बेकरीतून केक किंवा बेकरी प्रोडक्ट खरेदी करतो ते प्रोडक्ट कसे बनवले जातात हे पाहिले पाहिजे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आम्हाला तर केक कसे बनवतात ते माहिती नव्हतं.. पण आत्ता कळालं” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
I had no idea this is how cakes are made 😯 pic.twitter.com/8POleVgUgC
— Chirag Barjatya (@chiragbarjatyaa) July 22, 2023