सोनिया गांधींसमोर भररस्त्यात राहुल गांधी गुडघ्यावर बसले अन… Video

0
432

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कर्नाटकातील भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला आणि सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो ट्रेंड होऊ लागले. मोठ्या अवधीनंतर पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सोनिया गांधी या आपला सुपुत्र राहुल गांधी व अन्य काँग्रेस नेत्यांसह दिसून आल्या. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात सोनिया गांधी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या घोषणाबाजी व जयजयकारात भारत जोडो यात्रा केली. यामध्ये राहुल गांधी व सोनिया यांचा एक फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

राहुल गांधी यांच्यावर अनेकदा टीका होत असल्या तरी त्यांच्या मातृप्रेमाचे सर्वचजण दाखले देतात. यावेळी सुद्धा राहुल व सोनिया गांधी यांच्या सुंदर नात्याची साक्ष देणारा फोटो व्हायरल होत आहे. आपण पाहू शकता की, या फोटोत राहुल यांनी सोनिया गांधी यांचे अक्षरशः पाय धरले आहेत. सोनिया यांच्या शूजची लेस बांधण्यासाठी राहुल गांधी अगदी भररस्त्यात गुडघ्यावर बसून लेस बांधत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करून राहुल यांना श्रावणबाळ म्हंटले आहे.