तिकीट नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्र्यांना कार्यकर्त्यांसमोर कोसळलं रडू; Video

0
23

देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारी करतांना दिसत आहे. या वर्षा अखेरीस देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे निवडणूक जाहीर होण्याअगोदरच मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने आणि तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) आपले उमेदवार जाहीर केले असून याठिकाणी इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज झाल्याचे समोर आले आहे
त्यातच आता तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि घानपूर (स्टेशन) मतदारसंघाचे विद्यमान आमदार थातिकोंडा राजैया यांना भारत राष्ट्र समितीचे
प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तिकीट नाकारल्याने त्यांना कार्यकर्त्यांसमोर रडू कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.