बुर्हाणनगर पाणी योजनेची पाईपलाईन पुन्हा फुटली, शिवसेना आक्रमक, गॅस लाईनचे काम करणारे पळाले video

0
722

गेल्या चार दिवसांपासून बुऱ्हाणनगर पाणीयोजनेला पाणी पुरवठा करणारी पाण्याची पाईप लाईन विळद ( ता. नगर ) येथे गॅस लाईन टाकणाऱ्या कामगारांनी फोडून ठेवली. गेल्या आठवड्यात सोलापूर रस्तयवरहीही असाच प्रकार घडला होता. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, उपतालुका प्रमुख प्रकाश कुलट विश्वासराव जाधव यांच्या सह या भागातील शिवसैनिकांनी या रस्त्यावर गॅस लाईनचे काम करणाऱ्या ठेकेदारास समज दिली व काम सुरळीत सुरू झाले. मात्र गेल्या चार दिवसापुर्वी मनमाड रस्त्यावील विळद जवळही अशीच घटना घटल्याने बुऱ्हाणनगर पाणी योजनेतून ४४ गावांना पाणी पुरवठा करणारी या योजनेत पाण्याचा ठणठणाट झाल्याने शिवसेना आक्रमक झाली. आज मंगळवारी संदेश कार्ले , व शिवसैनिक या कामाची पाहणी करण्यासाठी जात असल्याचे समजताच शिवसेनेचे आक्रमक रूप पाहुन मनमाड रस्त्यावर नांदगाव, देहरे, विळद येते काम करणारे गॅस लाईनचे काम करणारे कामागारांनी धूम ठोकली.


कार्ले यांनी स्थानीक नागरिक व शिसैनिकांच्या मदतीने मनमाड रस्तायावर फुटलेल्या या बुऱ्हाणनगर पाणी योजनेच्या पाईप लाईनचे तातडीने दुरूस्तीस सरवात केली असून उद्या बुधवार पर्यंत बुऱ्हाणनगर याजनेतील ४४ गावांचा पाणि पुरवठा सुरू करणार असल्याचे सांगितले.
औरंगाबाद, मनमाड, सोलापूर रस्त्यावर गॅसचे काम करणारी ठेकेदार कंपनी करतेय नागरिकांची अडवणूक.
नगर तालुक्यात बुऱ्हाणनगर व घोसपूरी या दोन पाणी योजना ग्रामीण भागातील तहान भागविणाऱ्या योजना आहेत . गेल्या चार महिन्यात वेगवेगळ्या महामार्गालगत गॅस लाईन टाकण्याचे काम करणाऱ्या या कामगार एजन्सींने या पाण्याच्या पाईप लाईन फोडून ठेवल्या असून परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा, करून पोलिस केस करण्याची धमकी देतात. या सर्व ठेकेदार व काम करणाऱ्या एजन्सींजना हात जोडून विनंती केली मात्र याचाउपयोग हत नसल्याने हेच विनंती करणारे हात यापुढे आपणास जेडण्यास वापरावे लागतील असा इशारा या वेळी उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनीसंबधीत ठेकेदार व गॅस लाईनचे काम करणाऱ्या कंपनींना दिला आहे.