हेल्मेट का नाही घातलं ?पोलिसांनी विचारताच तरुण गाऊ लागला गाणं व्हिडिओ

0
25

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पोलिसांना पाहताच तरुण बाईक थांबवतो. पोलिसांसह काही लोकांनी त्या तरुणाला घेरल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे इच्छा असूनही तेथून पळ काढणं अशक्य असल्याचं तरुणाच्या लक्षात येताच तो पोलिसांच्या कारवाईपासून आपला बचाव करण्यासाठी चक्क गाणं गायला सुरुवात करतो. शिवाय गाण्यातूनच तो आपली चूक झाल्याचंही कबुल करतो. शिवाय तो पोलिसांना आकर्षित करण्यासाठी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांशी संबंधित गाणं म्हणत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, असं तो गाण्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.