भाजपा मंत्र्यानं तक्रार करायला आलेल्या महिलेच्या कानशिलात लगावली व्हिडीओ व्हायरल!

    0
    1102

    एका सरकारी कार्यक्रमात तक्रार करणाऱ्या एका सामान्य महिलेला भाजपाच्या मंत्र्यानं रागाच्या भरात कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मंत्र्यानं कानशिलात लगावल्यानंतरही या महिलेनं संबंधित मंत्र्याच्या पाया पडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांवर सत्तेच्या मस्तीत अरेरावी केली जात असल्याची टीका आता विरोधकांकडून केली जात आहे.

    हा सगळा प्रकार शनिवारी कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील हांगला गावात घडला. कर्नाटकचे पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही. सोमण्णा हे एका शासकीय कार्यक्रमासाठी या गावात उपस्थित होते. सरकारकडून ग्रामस्थांना जमीन हक्कपत्र प्रदान करण्याचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात हक्कपत्र वाटप सुरू असताना अचानक एक महिला आपल्याला हक्कपत्र न मिळाल्याची तक्रार घेऊन समोर आली. या महिलेच्या वर्तनामुळे संतप्त झालेल्या मंत्रीमहोदयांनी थेट तिच्या कानशिलातच लगावली