काही दिवसांमध्ये आता संपूर्ण देशात दिवाळी हा सण साजरा केला जाईल. हा सण सुख-समृद्धी, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. यावेळी आपल्या खाण्यापिण्याची चांगलीच चंगळ असते. मुलांना तर हा सण खूपच जास्त आवडतो. याचं कारण म्हणजे दिवाळीला त्यांना भरपूर फटाके फोडायला मिळतात. फटाके आणि दिवाळी यांचं एक वेगळंच समीकरण आहे. दिवाळीला फटाके वाजवले नाहीत तर दिवाळी साजरी केल्यासारखी वाटत नाही. म्हणूनच लोक दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर अभ्यंगस्नान करून मैदानात फटाके फोडायला जातात.
दिवाळीमध्ये लोक फटाके फोडण्यासाठी खूपच उत्साही असतात. मात्र, याउलट काही लोक फटक्यांना फारच घाबरतात. फटक्यांमुळे आपण भाजले जाऊ अशी भीती त्यांना असते. अशी लोकं फटाके पेटवत असताना खूपच मजेशीर दिसतात. असाच एक प्रसंग बिहारच्या आमदाराबरोबर घडला आहे. सोनपुर येथील भाजपाचे आमदार विनय कुमार सिंह एका कार्यक्रमाच्यावेळी फटाक्याची वात पेटवल्यावर जोरात पळताना दिसले. मात्र यावेळी ते अचानक खाली पडले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बिहार के सोनपुर से पूर्व विधायक विनय सिंह पटाखा जलाकर भागते हुए मैदान में औंधे मुंह गिर पड़े,वीडियो सोशल मीडिया पर वायरल.
#ViralVideo #Bihar pic.twitter.com/ppSL09EksQ— Aanchal Dubey (@AanchalDubey21) October 18, 2022