राष्ट्रवादीत बंड…खा.डॉ.सुजय विखे म्हणतात…“अब काँग्रेस की बारी है”

0
17

विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली . संजय राऊत यांनी आतापर्यंत शिवसेना पक्ष फोडण्यासाठी मदत केली, आता राष्ट्रवादीसाठी फोडण्यासाठी मदत केली “अब काँग्रेस की बारी है।” असं सुजय विखेंनी म्हटलं आहे…आता काँग्रेस फोडण्यासाठी त्यांनी अशीच मदत करावी असं सुजय विखेंनी म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला. सुजय विखे असं देखील म्हणाले की, या अजित पवारांच्या बंडाविषया तसेच त्यांच्या शपथ विधीविषयी जे काही घडलं ते आम्हाला काही माहिती नव्हतं. आमच्या नियोजित कार्यक्रमात त्यामुळे कोणताही बदल झालेला नाही. जो काही निर्णय झाला तो वरच्या पातळीवर झाला. मात्र जो काही निर्णय आमचे वरिष्ठ घेतात त्यानुसार काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे या निर्णयाचं स्वागतआहे.