भाजपच्या खासदार कंगना रणौत यांनी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे, आमच्या खासदारांना टाके पडले आहेत, रक्तही आले आहे. त्यांनी (काँग्रेस) डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधानाबद्दल जे खोटे पसरवले आहे, त्याचा दरवेळी भांडाफोड झाला आहे. त्यांची क्रूरता आणि हिंसा आज संसदेपर्यंत पोहोचली आहे”, असे कंगना रणौत म्हणाल्या आहेत.
यासोबतच कंगना रणौत यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधींची तुलना एका जिम ट्रेनरशी केली आहे. “भाजप खासदारांवर राहुल गांधींनी आज संसदेत हल्ला केला, हा व्यक्ती संसदेत जिम ट्रेनरप्रमाणे बायसेप्स दाखवत येतो आणि आता लोकांना धक्काबुक्की आणि ठोसा द्यायला सुरुवात केलीय. राहुल गांधी हा एक कलंक आहे”, असेही कंगना रणौत यांनी त्यांच्या स्टोरीमध्ये लिहिले आहे.






