आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, भाजपची आपल्याच बड्या पदाधिकार्यांवर कारवाई

0
578

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी अरब देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला़ त्यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर रविवारी भाजपला कारवाई करावी लागली़.

एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील वादचर्चेत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आह़े दिल्ली भाजपचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनीही प्रेषितांबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप असून, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली़ शर्मा यांना पक्षाने निलंबित केल़े.

सर्व धर्माबद्दल पक्षाला आदर असून, कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अवमान करणे पक्षाला मान्य नाही, असे स्पष्टीकरण भाजपने रविवारी दिले.