BJP…विधान परिषद निवडणूक…माजी मंत्री प्रा.राम शिंदेंच्या आमदारकीसाठी आग्रह

0
1135
Ram Shinde Bjp MLC

BJP
नगर – 2019मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे (Ram Shinde) यांचा पराभव झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी व आगामी निवडणुकी संदर्भात भाजप मजबुतीसाठी राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, अशी गळ अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना घातली आहे. आगामी मे व जून महिन्यात होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीत राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी प्रथम संघटनात्मक पातळीवर करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवेदन देताना भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, सचिन पोटरे, नितीन दिनकर, सुनील पवार, अशोक पवार, गणेश पालवे, पप्पू गोधड आदींसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.राज्याच्या कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्याच्यावतीने सत्कार समारंभ अहमदनगरमधील पेमराज सारडा महाविद्यालयात आयोजित केला होता, यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, असा ठराव मांडला होता. या ठरावही यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला.