राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राज्य मंत्रिमंडळातील जागा निश्चित आहे. त्यामुळे भाजपातील ‘एक व्यक्ती एक पद’ या तत्वानुसार त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल. चंद्रकांत पाटील यांचा उत्तराधिकारी म्हणून 3 नेत्यांची नावं चर्चेत आहेत. राज्य भाजपाचा अध्यक्षही मुंबईतील द्यायचा ठरल्यास आशिष शेलार हे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातून राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. नगर जिल्ह्यातील शिंदे देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. नुकतीच विधान परिषदेवर त्यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर विदर्भातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे देखील नाव चर्चेत आहे.’






