Body Spray ची ‘ती’ जाहिरात वादग्रस्त, प्रियंका चोप्रासह सेलिब्रेटीजनी व्यक्त केली नाराजी..व्हिडिओ

0
810

Body Spray
सध्या सोशल मीडियावर बॉडी स्प्रेच्या जाहिरातीचा मुद्दा जोरदार चर्चेत आहे. लेयर शॉट या बॉडी स्प्रे ब्रँडची जाहिरात लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देत असल्याचं म्हणत अनेक सेलिब्रेटींनी या जाहिरातीवर टीका केली आहे. ही जाहिरात प्रसिद्धि माध्यमांवरून हटवण्याची मागणी केली आहे. या जाहिरातीवर अभिनेत्री प्रियांका चोप्रानं देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियांका चोप्रानं या बॉडी स्प्रे जाहिरातीवर आक्षेप घेत एक ट्वीट केलं आहे. तिने लिहिलं, “हे फारच लाजिरवाणं आणि घृणास्पद आहे. या जाहिरातीला हिरवा कंदिल मिळावा म्हणून किती पातळ्यांवर मंजुरी देण्यात आली आणि किती लोकांना हे सर्व योग्य वाटत आहे? मला आनंद वाटतो की मंत्रालयाने यावर योग्य वेळी कारवाई करत ही जाहिरात हटवली आहे.”