आरोग्यदायी म्हणून ब्राऊन ब्रेड सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे. मात्र हा ब्राऊन ब्रेड कुठे अन् कसा बनतो हे तुम्हाला माहितीये का? अस्वच्छतेबाबत यापूर्वी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.मात्र हे पदार्थ कुठे बनतात कसे बनतात याबद्दल आपल्याला काही माहित नसते. असाच एक किळसवाना व्हिडीओ समोर आला आहे.
हव्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जो पाहिल्यानंतर ब्राऊन ब्रेड तुम्ही खाण्याचा विचारही करणार नाही.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे, की ब्राऊन ब्रेड कसा बनवला जातो. जर तुम्हाला वाटत असेल की ते गव्हाच्या पिठापासून तयार केलं आहे, तर हे बघाच. व्हिडिओमध्ये ब्राउन ब्रेड बनवण्यासाठी कामगार मैदाच वापरत होते. ते बनवताना ते सर्व घटक वापरले जातात जे व्हाईट ब्रेड बनवण्यासाठी वापरले जातात. फक्त एक अतिरिक्त गोष्ट वापरल्याने त्यांचा पांढरा रंग ब्राउन झाला. ती म्हणजे ब्राउन रंगाचा वापर. या ब्राउन ब्रेडला फक्त रंग मिसळून व्हाईटपासून ब्राउन बनवलं गेलं.






