BSNL Prepaid..
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कंपनीने ग्राहकांसाठी Summer Offer सादर केली आहे. ही एक लिमिटेड पीरियड ऑफर असून, याचा फायदा २,३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानवर मिळेल.
BSNL Summer Offer अंतर्गत २,३९९ रुपयांच्या प्लानवर फायदा मिळेल. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, कंपनी कॉलर ट्यून सेवा आणि इरोज नाऊचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. मात्र, समर ऑफर अंतर्गत यूजर्सला ६० दिवसांची अतिरिक्त वैधता देखील मिळेल. याचा अर्थ यूजर्सला या प्लानसोबत एकूण ४२५ दिवसांची वैधता मिळेल. या प्लानमुळे तुम्हाला वर्षाला केवळ एकदाच रिचार्ज करावे लागेल.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल भन्नाट प्रीपेड प्लॅन…एकदाच रिचार्ज करा…60 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळवा!