अहिल्यानगर ‘मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल’ साठी अर्ज करण्याचे आवाहन

0
42

‘मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल’ साठी अर्ज करण्याचे आवाहन

अहिल्यानगर दि.३०- दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्यादृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हीईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत https://register.mshfdc.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व्हावे तसेच सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांगांना त्यांच्या कुटुंबासमवेत जगण्यास सक्षम करण्याच्यादृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे.
***