भारतात ‘या’ ठिकाणी आहे मांजरीचे मंदिर, १ हजार वर्षांपासून मांजरीला मानतात देवी

0
34

भारतीय प्रथेनुसार काही प्राण्यांना अशुभ मानले जाते. यातील एक प्राणी म्हणजे मांजर आहे. रस्त्यावरून मांजर आडवी गेली की अजूनही हा अशुभ संकेत असल्याचे समजले जाते. पण भारतात चक्क एका ठिकाणी मांजराची पूजा केली जाते. होय, हे खरंय. भारतात मांजरीचेही मंदिर आहे. भारतात एका ठिकाणी मांजराचं मंदिर असून येथे हजारो काळापासून पूजा केली जाते.
भारतातील कर्नाटक मध्ये हे मांजरीचं मंदिर आहे. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात हे ठिकाण आहे. येथे बेक्कालेले नावाचे गाव आहे.
बेक्काले गावातील हे मंदिर गेल्या १००० वर्षांपासून तसेच आहे. येथे आजही मांजरीची पूजा केली जाते. गावातील लोक मंगम्मा देवीला आपली कुलदेवी मानतात. यामुळेच जर कोणी गावातील मांजरांना इजा केली तर त्यांना त्यांना गावातून हाकलून दिले जाते. या गावात एखादे मांजर मेले तरी पूर्ण विधीपूर्वक दफन केले जाते.