चाणक्य सूत्र… ‘अशा’ लोकांपासून कायम दूर रहा, सापा पेक्षाही धोकादायक

0
1236

आचार्य चाणक्य म्हणतात की, दुर्जन (दुष्ट, धूर्त आणि कपटी) माणसापेक्षा साप चांगला आहे. कारण साप तेव्हाच त्रास देतो, जेव्हा तुम्ही त्याला त्रास देता. पण, वाईट माणसाची संगत आपल्याला नेहमीच संकटात टाकते. काही व्यक्तींसोबत तुम्ही नेहमी चांगले वागलात तरी तो नेहमीच तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतो. असे लोक विषारी सापापेक्षा जास्त धोकादायक असतात. ते तोंडावर आपल्यासमोर चांगले वागतात आणि पाठीमागे तुम्हाला नुकसान करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

साप दातातून विष सोडतो, विंचूच्या शेपटीत विष असते, पण दुष्ट माणसाचे संपूर्ण शरीर आणि मन विषारी असते. तो तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, सावध राहा, अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्या संगतीमध्ये राहु नका. बऱ्याचदा हे लोक आपले जवळचे नातेवाईक, भाऊ-बहीण मित्रदेखील असू शकतात.