मँगो, व्हेनिला, स्ट्रॉबेरी, केसर कुल्फी असे शेकडो आईस्क्रीमचे प्रकार आहेत. पण हे सगळे प्रकार कमी होते म्हणून की काय आता एक नवं आईस्क्रीम बाजारात आलंय. या पदार्थाला ‘छोले भटूरे आईस्क्रीम’ असं म्हटलं जातं. छोले भटूरे ही डीश देशभरात मोठ्या आवडीनं खाल्ली जाते. पण या मसालेदार पदार्थापासून चक्क एक आईस्क्रीम तयार करण्यात आलं आहे. सर्वात आधी एक भटूरा घेतला आणि त्याला छान बारीक केलं. मग त्यावर छोल्यांची भाजी टाकून मिश्रण एकजीव करून घेतलं. पुढे या मिश्रणात फ्रेश क्रिम आणि मिल्कमेड टाकून एक गोड पदार्थ तयार केला. शेवटी हा पदार्थ बर्फाच्या लादीवर पसरवून छोले भटूरे आईस्कीम तयार केलं. आणि या आईस्क्रीमचे रोल करून ते मिरचीसोबत खायला दिले.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल ‘ही’ आईस्क्रिम पाहून तुम्हाला थंड नाही वाटणार तर घाम फुटेल…व्हिडिओ






