Video: भर लग्नात नवरदेवाच्या भावंडात अन् मित्रांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी

0
17

लग्न कार्य म्हटलं की लग्नघरात गोंधळ सुरू असतो. मित्र मंडळी तसंच लाडक्या भाऊ- बहिणीचां प्रचंड गोंधळ सुरू असतो. नुसती धावा-धाव असते. मात्र आपण अनेकदा लग्नात क्षुल्लक गोष्टींवरून झालेल्या हाणामारीचे व्हिडीओ पाहिले असतील. अशातच सोशल मीडियावर चक्क एका लग्नात नवरदेवाच्या भावाडांत आणि मित्रामध्ये जोरदार हाणामारी होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. यात काही व्यक्ती मडंपातील खुर्च्या उचलून एकमेंकाना चक्क फेकून मारत आहेत. यात काहीच्या डोक्याला खुर्च्यांचा मार लागत आहे, तरी तेही थांबण्याचे नाव घेत नाही. ही हाणामारी दोन गटात होत आहे. तसंच काही तरुण लाथा बुक्क्यांनी एकमेंकाना मारहाण करत आहेत. या व्हिडीओत होणारी हाणामारीही चक्क नवरदेवाच्या भावाडांत आणि मित्रांमध्ये होत आहे. मात्र या तुफान हाणामारीचे कारण अद्याप समजू शकले नाही