मुख्यमंत्री दुसर्‍यांदा होणार विवाहबध्द, डॉक्टर आहे नवीन पत्नी

0
2504

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान चंदीगढ येथील त्यांच्या घरी डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत विवाहबद्ध होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री मान यांचा आधीही विवाह झाला होता. मात्र 6 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या पूर्वपत्नीशी घटस्फोट घेतला होता. . चंदिगडच्या सीएम हाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. 48 वर्षीय भगवंत मान यांचा 2015मध्ये पहिली पत्नी इंद्रप्रीत कौर यांच्यापासून घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्या मुलांसह अमेरिकेला गेल्या. सीएम मान यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून 2 मुले आहेत. त्यांची मुले-मुली अमेरिकेत असतात. भगवंत मान यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते आले होते.