Coca Cola Smartphone…आता कोका-कोला आणणार ‘कोला’ स्मार्टफोन

0
18

Coca Cola Smartphone प्रसिद्ध मल्टिनॅशनल बेवरेज कंपनी कोका-कोला बाजारात नवा स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. कोका-कोला कंपनीच्या स्मार्टफोनचा एक फोटोही लीक आहे. तसंच त्याच्या डिझाइनचाही खुलासा झाला आहे. एका गॅजेट कंपनीने केलेल्या दाव्यानुसार कोका-कोलाचा हा स्मार्टफोन लाल रंगात असेल.

या फोनचा फोटो लीक झाला असला तरी कोका-कोला कंपनीकडून मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यावर्षातच हा स्मार्टफोन बाजारात उतरवण्याच्या तयारीत कंपनी असल्याचंही सांगितलं जात आहे. दाव्यानुसार कंपनी ‘कोला फोन’ नावाने बाजारात हा फोन लाँच करेल. या स्मार्टफोनला ड्युअल कॅमेरा असेल. या फोनला 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 16 मेगापिक्सला फ्रंट कॅमेरा असेल. 7.6 इंच असलेल्या या फोनमध्ये 5000 mAh चा बॅटरी बॅकअप असेल. 4, 6 आणि 8 जीबी रॅममध्ये हा फोन उपलब्ध असेल आणि सामान्यांना परवेल अशा किंमतीत म्हणजे 20 हजार रुपयांपर्यंत याची किंमत असेल.


WhatsApp Image 2023 01 29 at 12.55.44 PM