Congress नेते राहुल गांधी पुन्हा अडचणीत…‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन भाजपने साधला निशाणा

0
1004
Congress

Congress…
भाजपा नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ तेलंगणात शेतकरी रॅली सुरू होण्याआधीचा आहे. यामध्ये राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान आजचा विषय काय? मला काय बोलायच आहे? असा प्रश्न राहुल सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत.
भाजपा नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. याआधीही मालवीय यांनी राहुल गांधीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ते नेपाळच्या एका नाईटक्लबमध्ये दिसून आले होते. त्यांच्यासोबत एक महिलाही होती. या व्हिडीओवरून राहुल गांधीवर भाजपाने टीकास्त्र सोडले होते.