कैसा ये इश्क है…भर रस्त्यात गाडीवर रोमान्स करताना बेभान झाले कपल..व्हिडिओ

0
45

प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हणतात. पण यांनी तर या म्हणीला फारच गांभीर्यानं घेतलेलं दिसतेय, अन्यथा चालत्या बाईकवर अशा पद्धतीनं रोमान्स करण्याचं धाडस कोणी केलं नसतं. मीडिया रिपोर्टनुसार ही घटना दिल्लीमध्ये घडली आहे. @shalukashyap28 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत हा व्हिडीओ ४३ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून १ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतेय की, यमराज सुट्टीवर असताना प्रेमी युगलाचं प्रेम उफाळून येतं, तर कोणी म्हणतेय, दिल्ली पोलिसांचं काम वाढवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. तसेच अनेकांनी या प्रेमी जोडप्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.