फलंदाजही अचंबित…वेस्ट इंडिज विरूद्ध विराट कोहलीने घेतला अप्रतिम झेल… व्हिडिओ

0
26

भारत आणि विडिंज यांच्यामध्ये बारबाडोस येथे पहिला एकदिवसीय सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करताना यजमान विडिंजचा संघाचा 114 धावांत खुर्दा उडाला. भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर विडिंजचे फलंदाज ढेपाळले. या सामन्यात विराट कोहलीने जबराट झेल घेतला. या झेलचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर रोमारियो शेफर्ड याचा झेल विराट कोहलीने अचूक टिपला. विराट कोहलीने घेतलेल्या या झेलचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.