Cricketभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला मारताना दिसत आहे.
रोहित शर्माचा मजा मस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चहलसोबत विराट कोहली आणि जयदेव उनाडकटही बसलेले दिसत आहेत. दरम्यान, रोहित शर्मा तिथे येतो आणि भारतीय कर्णधार चहलला मजेशीर पद्धतीने मारायला लागतो. आधी त्याने एक चापट मारली आणि मग नंतर चहलच्या मानगूट धरली आणि पकडून मारायला लागला. हे सुरु असताना विराट कोहलीचे हावभाव पाहण्यासारखे होते.
Rohit yaar😭😭 pic.twitter.com/t6rlt6KeLe
— nidhi (@dumbnids) July 30, 2023