Cricket News live
मुंबईचा फलंदाज सरफराज खानची रणजी ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. सरफराजने रणजी ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत उत्तराखंडविरुद्ध शतक ठोकलं. सरफराजने 140 बॉलमध्ये 11 चौकार आणि 2
षटकारांच्या मदतीने त्याचं शतक पूर्ण केलं. तो रणजी ट्रॉफीच्या या मोसमात सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. सरफराजच्या नावावर या मोसमात 600 पेक्षा जास्त रन झाल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं त्याचं हे सातवं शतक होतं. 153 रनची खेळी करून सरफराज आऊट झाला. आपल्या या शतकीय खेळीमध्ये त्याने 205 बॉलचा सामना करत 14 फोर आणि 4 सिक्स लगावले. मागच्या 5 इनिंगमध्ये त्याने 156 च्या सरासरीने 624 रन केल्या आहेत.
सरफराज खानच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 हजार रन पूर्ण झाल्या आहेत. त्याने या रन 80 पेक्षा जास्तच्या सरासरीने केल्या आहेत. 2 हजार रन करताना ब्रॅडमननंतर सरफराजची सरासरी सर्वोत्तम आहे. विजय मर्चंट यांनी 71.64 च्या सरासरीने, जॉर्ज हेडली यांनी 69.86 च्या सरासरीने आणि बहिर शाह यांनी 69.02 च्या सरासरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 हजार रन पूर्ण केल्या होत्या.