सेम टू सेम धोनी….सुर्यकुमार यादवचा ‘हेलिकॉप्टर’ शॉट चर्चेत…Video

0
44

भारताचा मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिलं जावं की नाही अशी परिस्थिती मागील काही सामन्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र आपल्या टीकाकारांना सूर्यकुमारने बॅटनेच उत्तर दिलं आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत भारताचा विजय सुखकर करुन दिला. सूर्याच्या फलंदाजीच्या जोरावर भारताला वेस्ट इंडीजविरुद्धचा केवळ तिसरा सामना जिंकता आला . 13 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जोसेफच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने लेग साईडला उत्तुंग षटकार लगावला. सूर्याने लगावलेला हा फटका धोनीच्या प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटसारखा होता. सध्या सूर्याच्या या हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.