या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती मगरीला त्रास देतोय. एक व्यक्ती हातामध्ये चाकू घेऊन थांबलेला दिसतो. तर मगरीचं पिल्लू रस्त्यावर पडलेलं दिसतं. व्हिडिओ पाहताना दिसतंय, की हा व्यक्ती चाकू घेऊन मगरीच्या पिल्लाला इजा करण्यासाठी पुढे जात आहे. मात्र, सुदैवाने मगरत्याच्या तावडीतून वाचते आणि रस्त्याच्या कडेला जाते. यादरम्यान मगर सावध होते आणि हल्ला करण्याच्या बेतात येते. त्याने चाकूने वार करताच मगर जोरात आपल्या जबड्यात त्याचा हात पकडते. यानंतर हा व्यक्ती जोरात स्वतःचा बचाव करत मागे सरकतो आणि खाली पडतो.
Dude attacks alligator and pays the price pic.twitter.com/oYEHivA9E0
— Crazy Clips (@crazyclipsonly) May 25, 2023