Home ब्रेकिंग न्यूज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि समर्थकांना मिळणार ‘ही’ महत्वाची खाती…

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि समर्थकांना मिळणार ‘ही’ महत्वाची खाती…

0
27

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह त्यांच्या एकूण 9 सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्र्यांना संध्याकाळपर्यंत खाती दिली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची यादी समोर आली आहे. अजित पवार यांच्या गटाला 11 खाते दिली जाणार आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवार यांच्या गटाला अर्थ किंवा महसूल, महिला आणि बाल विकास, क्रीडा आणि युवक कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय, मासेमारी वस्त्र मंत्रालय, मागास आणि बहुजन कल्याण, वाहतूक, गृहनिर्माण, अल्पसंख्याक, वक्फ, सामाजिक न्याय आपत्ती व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन ही 11 खाती देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.