कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडीच्या सरपंच शकुंतला गुडघे व त्यांचे पती निरंजन गुडघे यांना रात्रीच्या दरम्यान तिघांनी जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत निरंजन गुडघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सरपंच शकुंतला गुडघे व त्यांचे पती निरंजन गुडघे यांना शिवीगाळ करत आरोपींनी दम दिला. रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. गुडघे यांनी आजूबाजूच्या शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. एका मंदिर परिसरात आरोपी शिवीगाळ करू लागले. रात्री शिर्डी संस्थानची ड्युटी करून आलेल्या विजय गुडघे (सिक्युरिटी ऑफिसर) यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. सर्व घटना पोलिस पाटील दगु गुडघे यांनी तालुका पोलिस स्टेशनला कळवली. रात्री उशिरा निरंजन गुडघे यांनी आरोपी विजय सुभाष खोमणे, योगेश विठ्ठल वर्पे व दीपक सुभाष खोमणे यांच्या विरोधात फिर्याद दिली.
दरम्यान,आरोपींनी गावात येण्या अगोदर नगदवाडी येथे मित्रांसोबत बसलेल्या एका अल्पवयीन मुलास कारण नसताना मारहाण केली. त्या मुलाची आई मुलाला सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही आरोपींनी दमबाजी केली. या घटनेबाबत गणेश माळी यांनी आरोपींच्या विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.दरम्यान आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
आरोपींच्या अडून जर कोणी त्रास देत असेल तर त्याचाही बंदोबस्तकेला जाईल. असे पोलिस निरीक्षकसंदीप कोळी यांनी सोनेवाडीच्या नागरिकांना सांगितले.






