IPL फायनलनंतर ‘ती’ला प्रपोज करायचा होता, पण… दीपक चहरने सांगितला ‘तो’ किस्सा Video

0
24

एम एस धोनी फक्त चालाख आणि महान कर्णधार आणि विकेटकीपरच नाही, तर तो एक जबरदस्त लवगुरु सुद्धा आहे. याचा खुलासा टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपर चहरने नुकताच केला आहे. दीपकने ऑक्टोबर २०२१ मध्ये दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पंजाब किंग्जविरोधात झालेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएल २०२१ च्या सामन्यात प्रेयसी जया भारद्वाजला अचानक प्रपोज केला होता. दीपकने अचानक केलेल्या अशा कृत्यामुळं जयाला धक्का बसला होता. त्यानंतर तिने दीपकला होकार दिला आणि लव्हबर्ड्सने स्टेडियममध्ये एकमेकांना अंगठी घातली होती.

दीपक चहर आणि जया भारद्वाज जून २०२२ मध्ये आग्र्यात लग्नाच्या बंधनात अडकले होते. याचदरम्यान रोमॅंटिक प्रपोजलची कल्पना एम एस धोनीनं चहरला दिली होती. त्यानंतर त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएल २०२१ च्या प्ले ऑफच्या सामन्यात जयाला प्रपोज केलं होतं. त्यावेळी चहर जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि सीएसके फायनलमध्ये पोहोचली होती.