मी कुठेही गेलो तरी लोक मला पुरणपोळीच देतात,फडणवीस म्हणाले पहिलंच सांगतो पुरणपोळी

0
422

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नाआधी देवेंद्रजी एका बैठकीत 35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपासह खायचे असं त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटलं आणि एकच चर्चा सुरु झाली. मग यावर देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाच्या महाकट्टा कार्यक्रमात मला पुरणपोळी आवडत नाही असं स्पष्टपणे सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतो, मला बंगाली मिठाई आवडते, ती द्या पण पुरणपोळी देऊ नका, असंही म्हटलं. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि पुरणपोळीचा किस्सा एबीपी माझाच्या बालदिनाच्या कार्यक्रमात समोर आलाय.

एबीपी माझाच्या बालदिन विशेष कार्यक्रमात मुलांनी फडणवीसांसोबत गप्पा मारल्या. यावेळी एका चिमुरड्याने ‘तुम्हाला गोडात सर्वात जास्त काय आवडतं?’ असा प्रश्न फडणवीसांना विचारला. त्यावर बोलताना ते म्हणाले, की ‘मी पहिलंच सांगतो की मला पुरणपोळी आवडत नाही, माझ्या बायकोच्या एका उत्तरामुळे अनेक लोकांचा समज झालाय की मला पुरणपोळी आवडते. त्यामुळे मी कुठेही गेलो तरी लोक मला पुरणपोळीच देतात’ असं देवेंद्र फडणवीसांनी यांनी सांगितलं आणि उपस्थित चिमुरडे हसू रोखू शकले नाहीत.