देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांचा दिक्षा सोहळा

0
900

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांनी स्थापित केलेले भगवान श्रीदत्तप्रभूंचे स्थान असलेल्या श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे महंत हभप भास्करगिरीजी महाराज यांनी आपल्या अध्यात्मिक कार्यासाठी कृष्णा महाराज मते यांची देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी म्हणून निवड केली. कृष्णा महाराज मते यांना दीक्षा समारंभ शुक्रवारी संपन्न झाला. कृष्णा महाराज मते यांचे महंत प्रकाशानंदगिरी महाराज असे नवे नामकरण करण्यात आले. कृष्णा महाराज मते यांना पंच गुरूंनी दीक्षा दिली.

या प्रसंगी जुना आखाडाचे वेदव्यास पुरी जी महाराज, महंत देवेंद्रजी गिरी महाराज, महंत भास्करगिरी महाराज, महंत शिवानंदजी गिरी, महंत नारायनगिरीजी महाराज, महंत विश्वभर गिरी महाराज, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार हरिभाऊ बागडे, माजी मंत्री शिवाजी कर्डीले, आदी उपस्थित होते.