Dhananjay Munde यांना महिलेची धमकी, 5 कोटी द्या नाहीतर बलात्काराची तक्रार करेल!

0
1163
dhanajay munde

Dhananjay Munde
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास तुमच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करेन आणि तुमची सोशल मीडियावर बदनामी करेन, अशी धमकीही या महिलेने धनजंय मुंडे यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत धनजंय मुंडे यांनी आपण या महिलेला ओळखत असल्याचे नमूद केले आहे. तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले. याशिवाय, एक महागडा मोबाईलही कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता, असेही धनजंय मुंडे यांनी सांगितले आहे. मलबार हिल पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे.