व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चॉकलेट डोसा बनवताना दिसत आहे. किट-कॅट भरून त्याने डोसा तर बनवलाच आहे, पण डोसा बनवल्यानंतर वर किट-कॅट चॉकलेट टाकून एक अनोखी डिश तयार केली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने आधी पॅनवर एक मोठा डोसा बनवला आणि नंतर त्यात चॉकलेटसह विविध गोष्टी मिसळल्या. तुम्ही मसाला डोसा खाल्ला असेल, पण चॉकलेट डोसा तुम्ही क्वचितच पाहिला किंवा खाल्ला असेल. या विचित्र पदार्थाने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या विचित्र डिशचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.






