मी सांगत होतो.. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवणार : खा. डॉ. सुजय विखे पाटील

0
834

अहमदनगर – राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जी बंडाळी सुरु आहे. तो विषय शिवसेनेचा अतंर्गत आहे यांचा ऑपरेशन लोटसशी कुठला ही संबंध नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे श्री सिद्धविनायक गणपतीचे दर्शन व वडारवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
अंबालिका बारडगाव सुद्रिक येथे विविध कार्यकारी सोसायटी च्या नुतन सदस्यांचा सत्कार व शिबस्मित मल्टि स्टेट चा शुभारंभ खासदार डॉ विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ. सुनील गावडे, अशोक खेडकर, शांतिलाल कोपणर, दादासाहेब सोनमाळी, एन. एस. पाटील, नितीन लोंढे, गोकुळ पवार, तात्यासाहेब माने, सह परिसरातील ग्रामस्थ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार डॉ. विखे पा.म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेनेचे 39 आमदार वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचार घेवून महाविकास आघाडी सरकारातून बाहेर पाडले. हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. राज्यातील जबाबदार विरोधी पक्ष नेते म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांच्याकडे महाविकास आघाडी सरकराच्या विरोधात अविश्वास ठराव सादर केला असून त्यावर राज्यपाल निर्णय घेतील त्या नुसार बहुमत सिद्ध करण्यासाठीची रणनीती विधानसभेच्या पटलावर ठरेल. मला विश्वास आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी, गोरगरिबांचे व हिंदुत्त्ववादी सरकार येईल,

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे काम शिवसेना संपविण्याचेच होते. हे मी मागील दोन वर्षांपासून सांगत होतो की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या महाविकास आघाडी सरकारातून बाहेर पडून सामान्य शिवसैनिकां आजही हेच वाटते की हिंदुत्त्वादी पक्षांनी एकत्र येवून सरकार स्थापन करावे. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आपल्या पक्षाचे 39 आमदार सोडले, मात्र ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडायला तयार नाहीत. शिवसेनेच्या चुकीमुळेच शिवसेना संकटात आहे. भाजप एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने सामान्य नागरिकांवरील संकटे वाढत असताना राज्यात स्थिर सरकार मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री अल्प मतात असल्याने बहुमत चाचपणीची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावत आहोत.