आठ लाखांचे लाच प्रकरण, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळेना न्यायालयाचा दिलासा नाही !

0
11

अहमदनगर महानगरपालिकेचे डॉ. पंकज जावळे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मागील आठवड्यामध्ये साडेआठ लाख रुपयांची लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला होता . डॉ. पंकज जावळे यांचे स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांनी एका बिल्डर कडून लाच मागितली होती त्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली असून पुढील सुनावणी ही सोमवार आठ जुलै रोजी होणार आहे.