शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय अँटी डिफेक्शन कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.
“कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो. घटनेच्या १० व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत,” असं त्यांनी म्हटलं आहे. “१२ आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत,” असंही ते म्हणाले.
कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?
तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!
घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.#RealShivsainik— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022






