Electric Scooter…इलेक्ट्रिक स्कूटरच्या मदतीने ग्राहकांना कमी पैशात उत्तम ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते. इलेक्ट्रिक स्कूटर केवळ प्रदूषणापासून वाचवण्यास मदत करत नाहीत तर युजर्सचा पेट्रोल-डिझेलवरील खर्च वाचवतात. तसेच सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देखील देत आहे, ज्याच्या मदतीने ग्राहक कमी खर्चात एकापेक्षा एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्स घरी आणू शकतात. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटरच्या देखभालीचा खर्चही खूप कमी आहे.
Bajaj Chetak EV : ही स्कूटरदेखील ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. या स्कूटरसाठी ग्राहकांना १,४२,२९७ रुपये मोजावे लागतील. यामध्ये दोन व्हेरिएंट आणि ६ कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. बजाज चेतक EV मधील मोटर 3800 W पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. या स्कूटरची रेंज ९५ किलोमीटरपर्यंत आहे.
Ola S1 Pro: ओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारात दोन इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर केल्या आहेत. त्यापैकी ओला एस 1 प्रो स्कूटरला ग्राहकांची पसंती मिळत आहे. या स्कूटरची किंमत १.२७ लाख रुपये इतकी आहे. ही स्कूटर केवळ एका व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
Ather 450X: या इलेक्ट्रिक स्कूटरची भारतीय बाजारातील किंमत १,४०,२८० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर २ व्हेरिएंट आणि ३ कलर ऑप्शन्समध्ये येते. या स्कूटरच्या टॉप व्हेरिएंटसाठी ग्राहकांना १,५९,२९१ रुपये मोजावे लागतील. ही स्कूटर ३३०० वॉट पावर जनरेट करते.
Simple One Electric: सिम्पल वन इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर २०० किलोमीटरपेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड १०५ किलोमीटर प्रति तास इतका आहे.
Okhinawa Okhi-90 : ओकिनावाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १.२१ लाख रुपये इतकी आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड ९० किलोमीटर प्रति तास इतका आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये ईको मोडवर २०० किलोमीटरपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. या स्कूटरमध्ये स्वॅपेबल 3.6kWh, लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडिओ….ट्रक ड्रायव्हरचे हुबेहूब मोहंमद रफी स्टाईल गाणे..