मा.मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले..मंत्री महोदय आम्ही मंजूर केलेल्या विकास कामात आडकाठी!

0
2385

नगर प्रतिनिधी – बुऱ्हानगर व ४४ गावाचा विस्कळीत पाणी पुरवठा गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे त्यामुळे या गावातील नागरिकांना तीव्र स्वरूपाच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी प्रशासनाला विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आले तसेच सरपंच व प्रशासनाच्या बैठकाही झाल्यात या विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीने विजेचे बिले भरले असतानाही पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन कट केले जाते, वारंवार या योजनेचे पाणी बंद पडले जाते तरी येत्या आठ दिवसात बुऱ्हानगर व ४४ गावांची पाणी योजना सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन ग्रामस्थांच्यावतीने छेडले जाईल असा इशारा मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी हरिभाऊ कर्डिले, संतोष म्हस्के, विलास शिंदे, दिलीप भालसिंग, रबाजी सुळ, अभिलाष घिघे, अनिल करंडे, कानिफनाथ कासार, जालिंदर कदम, झुंबर पवार, सुरेश सुबे, संतोष झिणे, दादा दरेकर, रेवन चोभे, सुधीर भापकर, संभाजी पवार, जगन्नाथ मगर, आदेश भगत, सुरेश वारूळे, राम पानवळकर, गणेश पवार, दशरथ कराळे, राधिका प्रभूने, बापु बेरड, बाबासाहेब अमृते, बाळासाहेब कोळेकर, सुनील पवार, राजश्री मगर, विलास लोखंडे, विशाल गागरे, आदिनाथ मोडवे, संतोष करांडे, योगेश बेरड, महेश म्हस्के, कैलास पठारे, संपत निमसे, सीताराम दाणी, बबन आव्हाड, सुनील नरवडे, रामदास सोनवणे, रावसाहेब कर्डीले, रंगनाथ कर्डिले, श्रीधर पानसरे, रबाजी कर्डिले, रवी कर्डिले, दीपक कार्ले, बाळासाहेब निमसे, उद्धव कांबळे, राजू तोडमल, स्वाती बेरड, संजय पाटील आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, बुऱ्हानगर पाणी योजनेच्या मिरी तिसगाव या योजनेचे वीज कनेक्शन स्वतंत्र करावे, तसेच नगर-सोलापूर मनमाड हायवेचे काम सुरू आहे तसेच औरंगाबाद महामार्गावर गॅस पाईपलाईनचे काम चालू असल्याने सदर बुऱ्हानगर पाणी योजनेची पाईपलाईन वारंवार या कामामुळे फुटली जाते ठेकेदार प्रशासन यांच्यात कोणताही समन्वय नसल्याने १५ ते २० दिवस पाणी ग्रामस्थांना उपलब्ध होत नाही त्यामुळे जनतेमध्ये तीव्र स्वरूपाचा रोष निर्माण झाला आहे. या रोषाला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. गेल्या तीन वर्षात महाविकास आघाडी सरकारने कोणतेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे जनतेला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते आमच्या काळात झालेले विकास कामाचे उद्घाटन करण्यात मंत्री महोदय धन्यता मानत आहेत, आम्ही मंजूर करून ठेवलेल्या विकास कामात आडकाठी ते आणत आहेत बुऱ्हानगर व ४४ गावाची पाणीयोजना सुरळीत राहावी यासाठी मंत्रिमहोदयांनी शासनाकडून वीज बिलासाठी निधी उपलब्ध केला नाही तसेच प्रयत्नही करत नाही असा आरोप मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केला.