अहमदनगर जिल्हयातील सुरक्षा रक्षक पदासाठी भरती, माजी सैनिकांनी…

0
21

सुरक्षा रक्षक पदासाठी माजी सैनिकांनी 19 जानेवारीपर्यंत

अर्ज सादर करण्याचे आवाहन

अहमदनगर :- जिल्हयातील कोपरगांव, श्रीरामपूर व संगमनेर आदी तालुक्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत असुन या ठिकाणी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणा-यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी बैठे पथके तसेच जिल्हयातील तालुक्यांचे ठिकाणी महसूल अधिकारी तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या

भरारी व फिरत्या पथकांची तातडीने नेमणूक करण्यात येणार आहे. गौण खनिज पथकासाठी बंदुकधारी पात्र १५ ते २० माजी सैनिकांची कागदपत्रे तपासून व मुलाखतीव्दारे कंत्राटी पध्दतीने एकत्रित मानधनतत्वावर निवड करण्यात येणार आहे.

शस्त्र परवानाधारक, स्वतःचे शस्त्र असणारे व शारीरिकदृष्ट्या सक्षम असणा-या पात्र माजी सैनिक उमेदवारांनी शस्त्र परवाना, डिस्चार्ज बुक, शस्त्र बाळगण्याचा परवाना, माजी सैनिक ओळखपत्र आदी कागदपत्रासह १९ जानेवारी, २०२३ पर्यंत परिपूर्ण अर्ज zswo_ahmednagar@maharashtra.gov.in या ईमेल पत्त्यावर अथवा 9405523160 या WhatsApp व्हाट्सअप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन स्क्वॉड्रन लिडर विद्यासागर कोरडे, (निवृत्त) ,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.